▶ दादेगाव येथे एक टोपले सुद्धा वाळू शिल्लक नसताना केला लिलाव
पैठण, (प्रतिनिधी): गोदावरी नदीचे पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून दादेगाव, पाटेगाव वडवाली वाघाडी नवगाव उंचेगाव येथे करण्यात आलेले साठे महसूल प्रशासनाने जप्त केले होते परंतु वाळू तस्कर यांनी हे सर्व साठे चोरून नेले आहे.
दादेगावचा लिलाव समस्यास्पद
दादेगाव येथे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून साठे करण्यात आले होते. परंतु या ठिकाणी एक टोपलाभर सुद्धा वाळू शिल्लक नसताना तहसील प्रशासनाने दादेगाव येथे वाळूचे साठे असल्याचे दाखवून उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री यांचे ११ नोव्हेंबर २०२५ रोजी चे पत्रानुसार तहसील प्रशासनाने याच
तारखेला ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर प्रगटन केल्याचे दाखवून दादेगाव जहागीर येथील गट नंबर मध्ये १३० ब्रास साठा असल्याचे कागदोपत्री दाखवले
तसेच सर्वात जास्त बोली ६६० रुपये ब्रास प्रमाणे सोपान रुस्तुम बोबडे यांची ८५ हजार ८०० रुपये बोली लावली असल्याने त्यांच्याकडून १२ डिसेंबर
महसूल प्रशासनाची बनवेगिरी
रोजी सर्व कर मिळून १ लाख ०७हजार २४४ रुपयाचे चलन भरून घेतले. या लिलावाची मुदत १५ डिसेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत देण्यात आली आहे.
मात्र या लिलावाच्या नावाखाली पैठण तालुक्यातून रॉयल्टी च्या नावाखाली दादेगाव, पाटेगाव, वडवाली, वाघाडी नवगाव, उंचेगाव येथून वाळूचा उपसा करून भर दिवसा वाळू माफियांनी वाळू चोरी करण्याचा प्रकार सुरू केला विशेष म्हणजे दादेगाव येथे रात्रभर केनीच्या सहाय्याने वाळू उपसा करून लिलावाच्या नावाखाली वाळूची वाहतूक केली जात आहे. विषय म्हणजे एकाच रॉयल्टीवर दिवसभर वाळूची वाहतूक सुरू आहे. याकडे तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन हे अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहेत. या लिलाव प्रक्रियाची जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात बनवाबनवी झाल्याचे आढळून येईल.
Mips lepaper sariwarta.in Powered By Vrudhee Solutions













